श्री तुळजाभवानी मातेचा छबिना उत्सव बद्दल माहिती
Shri Tulja Bhavani Temple Tuljapur
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मुर्ती एका चांदीच्या मेघडंबरी मध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनापैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मुर्ती व पादुका ठेवुन मंदिरा भोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करतात याला छबिना म्हणतात.
श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार , पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्या नंतर एक दिवस अश्या प्रमाणे करण्यात येतो .अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो .फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो.. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील २१ दिवस निद्राकाळातील छबिना काढला जात नाही.हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजरो भाविक येतात..
महत्व :- श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवा मध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजुतील सर्व गावांच्या शिवा येता या शिवांवर ( हद्द ) उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी उभी राहते . येते उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो .या छबीना याचे महत्व अधिक आहे तसेच अनेक भाविक छबिन्याच्या वेळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये छबीन्या समोर पोत पाजळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत असतात . या छबिन्या मध्ये प्रमुख वाद्य हे संभळ असते गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्या वेळी मंदिर परिसर हा मंगलमय वातवरणात हा छबिना उत्सव संपन्न होतो.
https://www.shrituljabhavani.com/ https://www.facebook.com/shritulja/?ti=as
Comments
Post a Comment