shri Tuljabhavani Navrathri Utsav Start Form Dt.17/10/2020 To 31/10/2020 www.shrituljabhavani.com   

श्री तुळजाभवानी शारदीय  नवरात्र महोत्सव २०२०

नवरात्र  उत्सव कशा प्रकारे साजरा करावा !

अनादी काळापासून श्री देवी महात्म्य श्री देवी विजय या ग्रंथात श्री कुलदेवी भवानी मातेच्या या नवरात्र उत्सवाची माहिती आहे कुलदेवीची सेवा उपसना नवरात्र महोत्सवात कशा प्रकारे करावी याची माहिती दिली आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात श्रीदेवीचा वास प्रत्येकाच्या घरात असतो नवरात्र प्रतिपदेस कुलदेवतेच्या नावे घट घालतात, प्रतिपदा ते नवमी या नवरात्रीच्या काळात श्री देवीचे नामस्मरण,उपासना आपल्या घरी करावी. नवरात्रात सप्तशती पाठ घरी करावेत.

नवरात्र काळात दिवस श्री भवानीदेवी नमः

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।

या मंत्राचा जप करावा.




 

श्री देवी भक्त

आपल्या परिवारास श्रीचा कृपा पूर्ण शुभाशिर्वाद , प्रतिवर्षाप्रमाणे श्री तुळजाभवानी देवीच्या  शारदीय नवरात्र महोत्सवा प्रित्यर्थ अश्विन शु. पासुन अश्विन पौर्णिमा पर्यंत श्री तुळजाभवानी  दरबारात नित्य जगदंबेची महापूजा,अभिषेक, पाद्यपूजा इतर पूजा होत असतातआपण श्री जगदंबा देवीचे नेहमी सेवा करणारे भाविक भक्त आहात. या उत्सवानिमीत्त आपल्या कुटुंबियांच्या वतीने कुलदैवत,कुलदेवी  श्री तुळजाभवानीची सेवा उपासना घडावी या हेतूने वार्षिक नवरात्र उत्सवाची पत्रिका पाठवली आहे. आपण आपल्या इच्छेप्रमाणे सेवा पाठवावी श्री तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद प्रसाद घ्यावा. नवरात्र महोत्सवात आपणा तर्फे श्री देवीची महापूजा,अभिषेक पूजा (भोगी),नंदादीप, गोंधळ,सप्तशती पाठ , नवचंडी, शतचंडी,खण-नारळ ओटी पूजा, नैवेद्य -सवाष्ण -ब्राह्मण भोजन इत्यादी जे काही विधी करायचे असतील त्या विधी करता मनीआर्डर /UPI द्वारे  अथवा ऑनलाइन रक्कम  पाठवावी म्हणजे श्रीदेवीची सेवा करून श्री तुळजाभवानीचा कृपाप्रसाद पोस्टाने पाठवून देऊ.

ललित पंचमी या दिवशी कुमारिकांना(१२वर्षाखालील मुलींना) दुध,पेढा दयावे, त्यावेळी त्यांना पान-सुपारी विडा, दक्षिणा द्यावी. नवरात्रात नऊ दिवस उपवास करावा, नऊ दिवस श्री देवीसमोर अखंड नंदादीप सतत चालू राहावा, तसेच महानवमी दिवशी श्रीदेवीस नैवेद्य दाखवून उपास सोडावा. या सर्व धार्मिक कार्याचे फळ आपणास म्हणजेच आपल्या कुटुंबियांस मिळते. याचा फायदा अनेक कुटुंबांना झाला आहे, यासाठी प्रति वर्षी आम्ही आपणास नवरात्र उत्सव बाबत माहितीसाठी आपणास नवरात्र कार्यक्रम पत्रिका पाठवत आहे. आपल्या कुटुंबियांवर श्रीदेवीची कायम कृपादृष्टी असावी, आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये आपली आर्थिक उन्नती व्हावी,धनधान्य, आरोग्यसंपन्न रहावे, आपल्या हातातून श्रीदेवीची कायम सेवा घडावी यासाठी आम्ही आपणास पत्र पाठवत असतो covid १९ या संसर्गजन्य साथीमुळे आपणास तुळजापूर ला येणे शक्य नसल्यास आपण ऑनलाईन धार्मिक पुजा विधी करू शकता आपल्या इच्छेनुसार धार्मिक पुजा-विधी करण्यात येतील ,श्री देवीची सेवा करण्यासाठी ऑनलाईन www.shrituljabhavani.com या वेबसाईटचा वापर करावा , कळावे आपला

श्री तुळजाभवानी देवीचे मुख्य पुजारी श्री. नागेश कालिदास साळुंके

पत्ता :- साळुंके गल्ली,शुक्रवार पेठ ,श्रीक्षेत्र तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद ४१३६०१ संपर्क :- 9763636868  /9028380005          www.shrituljabhavani.com                                                      shrituljabhavani9@gmail.com 

Comments

Popular posts from this blog

Tulja Bhavani Temple Tuljapur Opening Timings & Closing Timing