Posts

Showing posts from July, 2020

Tulja Bhavani Temple Tuljapur Opening Timings & Closing Timing

Image
Shri Tulja Bhavani Temple Tuljapur Opening  श्री तुळजाभवानी दैनंदिन पुजा माहिती . श्री तुळजाभवानी दैनंदिन पुजा माहिती सकाळी ६ वाजता देवीस पंचामृत अभिषेक घालतात.या वेळी देवीस मध , केळी , साखर , लिंबू आणि दही लावतात.  स्नानाकरिता गोमुखाचे पाणी वापरतात. या पूजेच्या वेळी भक्त आपल्या इच्छेनुसार दुध दही यांचे सिंहासन पूजा ,श्रीखंड तसेच आमरस , उसाचा रस यांनी स्नान घालून सिंहासन भरतात म्हणून याला सिंहासन पूजा असे म्हटले जाते. धुपारती :       दुपारी पूजारी व भक्त देवीची आरती म्हणतात. ऊद कपूर लावून हि आरती केली जाते. चरणतीर्थ काकडा आरती चरणतीर्थ :      प्रात:काळी ०४.०० वाजता अभिषेक पूजा :      सकाळी ०६.०० ते १०.०० वाजता वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती :      सकाळी ११.०० वाजता अभिषेक पूजा :       सायंकाळी ०७.०० ते ०९.०० वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती रात्री प्रक्षाळ पूजा :      रात्री ०९.३० वाजता चरणतीर्थ :     गर्दीच्या वेळी मा. अध्यक्ष यांच्या परवानगीने :       रात्री ०१ वाजता चरणतीर्थ गर्दीच्या वेळी पूजेच्या वेळात गरजेनुसार बदल करण्यात येतात.
Image
श्री तुळजाभवानी मातेचा छबिना उत्सव बद्दल माहिती Shri Tulja Bhavani Temple Tuljapur सर्वमङ्गलमाङ्गल्ये   शिवे   सर्वार्थसाधिके  । शरण्ये   त्र्यम्बके   गौरि   नारायणि   नमोऽस्तु   ते  ॥ छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मुर्ती एका चांदीच्या मेघडंबरी मध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनापैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मुर्ती व पादुका ठेवुन मंदिरा भोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करतात याला छबिना म्हणतात. श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार  ,  पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्या नंतर एक दिवस अश्या प्रमाणे करण्यात येतो .अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो .फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो.. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील    २१   दिवस निद्राकाळातील छबिना काढला जात नाही.हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजरो भाविक येतात..  महत्व   :-      श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवा मध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या